पुणे, ४ सप्टेंबर २०२३ : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंगापूरचा ३-० असा पराभव करून किमान कांस्यपदक मिळवले. अनुभवी शरथ कमल आणि इझाक क्वेक यांच्यातील पहिला एकेरी सामना रोमहर्षक होता आणि शरथने ११.१, १०.१२, ११.८, ११.१३, १४.१२ असा विजय मिळवला.
त्यानंतर जी साथियानने युएन केओन पांगचा ११.६, ११.८, १२.१० असा पराभव करत भारताला २.० अशी आघाडी मिळवून दिली. ६१व्या क्रमांकावर असलेला भारताचा सर्वोच्च मानांकित खेळाडू हरमीत देसाईने झे यू आणि क्लेरेन्स च्यु यांचा ११.९, ११.४, ११.६ यू असा पराभव केला. तिसऱ्या मानांकित भारताचा आता इराण किंवा चायनीज तैपेईशी सामना होईल. पुरुष संघाने दोन वर्षांपूर्वी दोहा येथे कांस्यपदक जिंकले होते. प्रदीर्घ कालावधीनंतर शरथ आणि साथियान यांनी एकेरीच्या क्रमवारीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहे. त्यात आणखी सुधारणा करण्याचा त्यांचा उद्देश असेल. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित भारताचा जपानकडून ३-० असा पराभव झाला.
जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या मिमा इटोने पहिल्या एकेरीत अहिका मुखर्जीचा ११.७, १५.१३, ११.८ असा पराभव केला. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत ३६व्या क्रमांकाची खेळाडू मनिका बत्राला, हिना हयाताकडून ७-११, ९-११, ११-९, ३-११ असा पराभव पत्करावा लागला. सुतीर्थ मुखर्जीचा १४व्या मानांकित मियू हिरानोने ७.११, ११.४, १.६, ११.५ असा पराभव केला. आता भारतीय संघ पाचव्या ते आठव्या स्थानासाठी वर्गीकरण सामना खेळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड