पुणे: पुण्यामध्ये सतत वाढत चाललेल्या ट्रॅफिकचा प्रश्न आणि त्याबरोबरच वाढत चाललेले अपघाताचे प्रमाण जा एक चिंतेचा विषय झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेच्या भाजप नगरसेविका सौ नीलिमा ताई खाडे यांनी रिक्षाचालकांसाठी एक लाखाचा मोफत विमा देण्याचे घोषित केले आहे.
१४ डिसेंबर रोजी नीलिमा ताई खाडे यांचा वाढदिवस आहे. या कारणास्तव त्यांनी रिक्षाचालकांना मोफत विमा वितरणाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. याअंतर्गत रिक्षाचालकांना एक लाखाचा अपघात विमा मोफत देण्यात येणार आहे. मोफत विवाह लाभासाठी नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे. कै. प्रतापमलजी डाबी पथ, अरुण सोसायटी, ओम सुपरमार्केट, मॉडेल कॉलनी शिवाजीनगर येथे संपर्क करून रिक्षाचालकांनी मोफत अपघात विम्यासाठी आपली नाव नोंदणी करायचे आहे.