अंडा पराठा

साहित्य:
• गव्हाचे पीठ तीन वाट्या
• चार अंडी
• २ बारीक चिरलेले कांदे
• १ टोमॅटो
• १ वाटी चिरलेली कोथिंबीर
• १ चमचा गरम मसाला
• हळद अर्धा चमचा
• आले-लसूण पेस्ट
• तीन छोटे चमचे सॉस
• मीठ चवीपुरते
• १ छोटी वाटी तेल

कृती:
• गव्हाच्या पिठात तेल, मीठ घालून भिजवा.
• आता कढईत तेल टाकून त्यात कांदा, आले, लसूण घालून चांगले परतवा.
• मग मसाला, मीठ, टोमॅटो टाकून मिश्रण चांगले शिजवा.
• त्यानंतर त्यात ४ अंडी फोडून टाका.
• अंडी त्या मिश्रणात एकजीव करा, त्यातील सर्व पाणी आटवा व त्यात कोथिंबीर व सॉस टाकून मिश्रण चांगले परतवा व थंड होऊ द्या.
• आता कणकेचे गोळे करून थोडे लाटा व त्यात मावेल तेवढी अंड्याची भाजी घाला व हळूहळू लाटा.
• नॉनस्टीक तव्यावर खरपूस भाजून वरून तेल टाका…

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा