सणासुदीच्या काळात नागपुरात डेंग्यूचा कहर,

नागपूर, २० सप्टेंबर २०२३ : एकीकडे जिल्ह्यात स्क्रब टायफस आणि स्वाइन फ्लूचा उद्रेक झालाय, तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात उत्साहाचे वातावरण असताना आता डेंग्यूनेही कहर केला. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण दाखल झाले आहेत. एकूण ७,००० नमुने तपासण्यात आले असून, ज्यामध्ये ८५० डेंग्यू बाधित असल्याचे आढळून आले.

डासांसाठी पोषक वातावरण असल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात असतानाही रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. १ ऑगस्ट रोजी शहरात डेंग्यूचे १११ रुग्ण होते. गेल्या ६० दिवसांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याने सणासुदीच्या काळात या आजाराने लोकांचे आर्थिक आणि शारीरिक नुकसान होत आहे.

गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, पाऊस गायब होताच आर्द्रता वाढल्याने डासांचा प्रादुर्भावही पुन्हा एकदा वाढला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यूच्या रुग्णांना विश्रांतीची गरज लागते. या काळात भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक असत. त्यात अजून भीती म्हणजे, एकदा डेंग्यू होऊन गेला तरी तो पुन्हा होण्याची शक्यता असते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा