आणेवाडी टोलनाका शिवेंद्रराजेंनी पाडला बंद

सातारा : पुणे – सातारा महामार्गावर मोठया प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्या विरोधात आज भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उतरलेल्या कार्यकर्त्यांनी वाई तालुक्यातील आणेवाडी टोलनाक्यावर टोल वसुलीचे काम बंद पाडले.

पुणे-सातारा महामार्ग सहा पदरी करण्याचे काम नऊ वर्षांपासून सुरू आहे. परंतु ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. खरंतर अडीच वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पुणे-सातारा महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. अनेक उड्डाणपुलांचे काम झालेले नाही, तरीही टोल वसुली सुरु आहे. त्याविरोधात आज आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला. या महामार्गावरील खड्डयांबद्दल नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका झाल्या. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. आणेवाडी टोलनाक्याच्या २५ किमी परिसरातील नागरिकांचे सतत या टोल नाक्यावरुन येणे-जाणे सुरु असते. त्यांना प्रत्येकवेळी टोल भरावा लागतो. त्यामुळे २५ किमीच्या परिसरातील गावांना तरतुदीनुसार सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा