रत्नागिरी, २२ फेब्रुवारी २०२४ : रत्नागिरी शहरातील शासकीय ग्रंथालयाच्या जागेमधील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आदेश झाले मात्र आदेश होऊनही कारवाईसाठी कुचराई केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून समजाच्या वतीने काल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रत्नागिरी शहरातील शासकीय ग्रंथालयाचे जागेमध्ये अवैध पद्धतीने ताबा घेऊन पडक्या भिंतीवर चादर टाकून त्याला मजारीचे स्वरूप देऊन अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात पत्र व्यवहार करण्यात आला होता. आपल्याही कार्यालयाने संदर्भीय पत्राने अतिक्रमण हटवून संरक्षक भिंत पुर्ववत बांधून देण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबतचे आदेश पारित करणारे पत्र दिले होते.
संदर्भीय पत्राच्या आदेशाचे पालन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अद्यापपर्यंत केले नाही. त्यामुळे अद्यापही शासकीय जागेमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण असून त्यावर आता दिवाबत्तीचा कार्यक्रम सुरु आहे. अशाप्रकारे चादर टाकून शासकीय जागा धार्मिक भावनांचा आधार घेऊन बळकावण्याचा प्रकार शहरातील अन्य काही ठिकाणी सुद्धा चालू असून शासकीय कार्यालयामधूनच अशा प्रकारांना पाठींशी घालत असल्याची शंका येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तसेच, संदर्भीय पत्राचा आदेशाचे पालन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केलेले नाही, तेव्हापासून अद्याप शासकीय जागेत बेकायदेशीर अतिक्रमण असून त्यावर आजपर्यंत चादर टाकून दिवाबत्ती कार्यक्रम सुरू आहे. म्हणजेच शासनाच्या जागेत पडलेल्या भिंतीच्या अवशेषांवर चादर टाकून तेथे धार्मिक भावना निर्माण करून रत्नागिरीमध्ये येऊ घातलेल्या ‘विभागीय वक्फ कार्यालय’ याचा गैरफायदा घेऊन शासनाची मिळकत लाटण्याचा कट चालू आहे. असे निवेदनात नमूद केले आहे.
रत्नागिरीमध्ये ‘विभागीय वक्फ कार्यालय’ होत असल्याने रत्नागिरीमध्ये शासकीय विभागीय ग्रंथालयाच्याच धरतीवर असे प्रकार जाणुन बुजून शासकीय व खासगी मिळकतींवर केले जात आहेत. यामध्ये १) गाव मौजे शिरगांव/आडी येथे एकही मुस्लिम व्यक्ती नसताना अनधिकृतपणे पिर दर्गा बांधकाम, २) रत्नागिरी मधील रत्नदुर्ग किल्ला हा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त केला असताना त्याजागेवर मालकी सांगून त्याठिकाणी निवासी बिनशेती रेखांकन, ३) तालुका राजापुर गाव मौजे पन्हळे येथे मुस्लिम लोक वस्ती नसलेल्या गावात होत असलेला मदरसा. अशा प्रकारचे बेकायदेशीर अतिक्रमणाचे प्रकार त्वरीत रोखले न गेल्यास रत्नागिरीत येणाऱ्या ‘विभागीय वक्फ कार्यालय’ याचा गैरफायदा घेऊन अशा अनधिकृत बांधकाम मजारी, मदरसे यांना धार्मिक जागा दाखवून शासकीय अथवा खासगी जागा गिळंकृत करण्याचा मुस्लिीम समाजाचा कट असल्याचे दिसून येते. यामुळे रत्नागिरीतील सामाजिक समरसता भंग करून विशिष्ट समाजाचे वर्चस्व निर्माण करण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. या कृतीचा सकल हिंदू समाजामार्फत निषेध करण्यात येत आहे. तरी सदरचे कार्यालय रत्नागिरी मध्ये करण्यात येऊ नये. अशी भूमिका ही निवेदनातून मांडण्यात आली आहे.
संदर्भीय पत्राने तुमचे कार्यालयाने अनिधिकृत अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता हे त्यांचे कर्तव्यात कसूर करीत आहेत. आदेशाचे पालन करत नसल्याने त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हा कार्यालयामार्फत दाखल करण्यात यावा अन्यथा फौजदारी प्रक्रीया संहीता १९७३ कलम १९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्याबाबत अधिक्षक अभियंता रत्नागिरी यांना आदेश करण्यात यावेत,असेही त्या निवेदनात म्हटले आहे.
अद्याप पर्यंत अनधिकृत बांधकाम पाडले गेले नाही तरी सदरील बांधकाम दि.२६/०२/२०२४ पर्यंत पाडण्यात आले नाही तर आम्ही सकल हिंदू समाज रत्नागिरी तर्फे दि. ०४/०३/२०२४ रोजी आपल्या कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा घेऊन येऊ असा इशारा प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर