२ फेब्रुवारी २०२५ भारत vs साऊथ आफ्रिका फायनल मॅच : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्वालालंपूर येथे अंडर -19 विश्वचषकाचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषक जिंकत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत केवळ 82 धावा करता आल्या. या धावाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 1 गडी गमावून केवळ 11.2 षटकांचा सामना केला.
भारतीय संघाने गोलंदाजी करताना सुद्धा शानदार कामगिरी केली. वैष्णवी शर्माने 2 मेडेन टाकत अवघ्या 9 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. याशिवाय त्रिशा गोंगडीने 4 षटकात 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या शानदर गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ मोठी धावासंख्या उभारण्यास अपयशी ठरला.
दुसरीकडे 82 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली राहिली. त्रिशा गोंगडीने 33 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 44 धावांची नाबाद खेळी केली तर सानिका चाळकेने 22 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अवघ्या 20 धावांवर त्यांनी आपल्या 3 विकेट्स गामावल्या. सलामीवीर सिमोन लॉरेन्सला आपले खाते सुद्धा उघडता आले नाही. कर्णधार कायला रेनेकेही फ्लॉप राहिली. तिने केवळ 7 धावा केल्या. खालच्या फळीत फलंदाजी करताना माइक वेनने आपल्या संघाला आधार देत 18 चेंडूत 3 चौकरांच्या मदतीने 23 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याशिवाय सलामीवीर जेम्मा बोथाने 14 चेंडूत 16 धावा केल्या, या दोघांशिवाय इतर कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर