जालना ५ फेब्रुवारी २०२५ : जालना अंबड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणीने पालक रागावले म्हणून स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला! या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.
तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी घबरून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आणि काही तासांतच सगळं सत्य समोर आलं. अखेर, पोलिसांसमोर तरुणीने स्वतःच कबूल केलं की तिने पालकांच्या रागाला घाबरून हा बनाव रचला होता.
या घटनेमुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अपहरणाच्या तपासासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र, अखेर सत्य उघड झाल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे पोलिस भरतीच्या उमेदवारांमध्येही चांगलीच चर्चा रंगली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे