७ फेब्रुवारी २०२५ मुंबई : क्रिकेट हा असा गेम आहे ज्यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू आतापर्यंत फ्लॉप राहिले आहेत. परंतु, काही दिवसानंतर त्यांच नशीब बदलल आहे. पण हेच नशीब भारताचा कर्णधार रोहित शर्मा याचे बदलण्याचे काही नावच घेत नाहीये. काल सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील रोहित फ्लॉप ठरला. त्याने अवघ्या ७ चेंडूत २ धावा केल्या. त्यामुळे चाहते मोठ्या प्रमाणात त्याला ट्रॉल करतायत. त्यातल्या त्यात रोहित आपल्या घरच्या मैदावर सुद्धा चांगली कामगिरी करेल असे वाटले होते. पण तिथे सुद्घा त्याची बॅट शांत राहिली. रोहितचा सातत्याने खराब राहिलेली कामगिरी आता भारतीय क्रिकेट बोर्डला सुद्धा आवडलेली नाही. त्यामुळे त्यांनी कर्णधार रोहित शर्मल शेवटची ताकीद दिली आहे.
बीसीसीआयने रोहितला दिली शेवटची वॉर्निंग :
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी कर अन्यथा कर्णधार पद सोड अशी ताकीद रोहितला दिली आहे. त्याच्यामागे कर्णधार पदाच्या शर्यतीमध्ये हार्दिक पांड्या आघाडीवर आहे. जरी शुबनम गिलकडे उपकर्णधार पद असल तरी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाची जबाबदारी हार्दिकवर सोपवली जाऊ शकते. त्याचबरोबर एका नवीन अहवालानुसार भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगली कामगिरी केली नाही, तर रोहितकडून कर्णधार काढून घेऊन हार्दिक पांड्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.
रोहितला २०२४ मध्ये १४ कसोटी सामन्यात २४.७६ च्या सरासरीने ६९९ धावा करता आल्या. मागच्या वर्षी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ सामने खेळले होते. त्यात त्याने २ अर्धशतकांसह १५७ धावा केल्या होत्या केल्या. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत सुद्धा त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामध्ये त्याने केवळ ३१ धावा केल्या होत्या. आगामी इंग्लंडविरुद्धची मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. कारण २०१३ नंतर टीम इंडियाला एकदाही ही ट्रॉफी उचलता आली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही ट्रॉफी मायदेशात आणेल असा विश्वास आहे. त्यासाठी रोहितचे फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेचा दूसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळवला जात आहे. यामध्ये रोहित शर्माकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर