आग्रामध्ये अमानुष अत्याचार! नवऱ्यासमोर पत्नीला नराधमांचा कहर, व्हिडिओ शूट करून धमकी

12

दिल्ली ८ फेब्रुवारी २०२५ :आग्रा शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घृणास्पद घटना घडली आहे. ट्रान्स यमुना परिसरात चार नराधमांनी एका महिलेवर तिच्या पतीसमोरच अमानुष अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर या राक्षसी कृत्याचा व्हिडिओ बनवून त्यांनी पती-पत्नीला धमकीही दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, १ फेब्रुवारीच्या रात्री सलीम शाह, अरमान, अमीन आणि शानू नावाच्या चार आरोपींनी तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. महिलेला सलीम शाहने पकडले, तर तिच्या नवऱ्याला बांधून इतर आरोपींनी बेदम मारहाण केली. नवऱ्याच्या विनवण्या आणि गयायाचनांना झुगारून नराधमांनी महिलेवर अत्याचार केला.
या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ बनवून आरोपींनी दाम्पत्याला तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, या घटनेबद्दल कोणाला काहीही सांगू नये, यासाठी दबाव टाकण्यात आला. मात्र, पीडित महिलेने हिंमत न हारता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा