‘महाकुंभ’ आणि पुणे रेल्वे: यशाचा अनोखा संगम!

25

पुणे १३ फेब्रुवारी २०२५: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या ‘महाकुंभ’ निमित्त पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली. या अद्वितीय उपक्रमामुळे पुणे रेल्वेने अवघ्या एका महिन्यात १०.४८ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे, ज्यामुळे रेल्वेच्या इतिहासात एक नवीन सुवर्ण अध्याय लिहिला गेला आहे.

या यशस्वी उपक्रमात १,०६,३३२ हून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून, अजूनही तिकिटांची मागणी वाढत आहे. पुणे रेल्वे स्थानकावरून तीन नियमित आणि तीन विशेष रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून एकूण ६५ फेऱ्या पूर्ण झाल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रयागराजच्या अलीकडील आठ महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्या थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर झाला.

महाकुंभाच्या गर्दीचा विचार करून प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले होते. प्रत्येक स्थानकावर पुरेसा पोलीस बंदोबस्त, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता आणि महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या यशस्वी कामगिरीबद्दल बोलताना, मध्य रेल्वे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा म्हणाले, “यशस्वी नियोजनामुळे पुणे रेल्वेला चांगला महसूल मिळाला आहे. भविष्यातही प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा