दुबई २० फेब्रुवारी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या हंगामाला काल पासून सुरुवात झाली असून आज या मालिकेचा दूसरा सामना दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा संघ कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दुबईच्या मैदानात उरणार आहे. भारतीय संघाचा मुख्य आणि अनुभवी गोलंदाज जसप्रीत बूमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने आजच्या सामन्यात मोहम्मद शमीकडे चाहत्यांचे जास्त लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या खेळवल्या गेलेल्या दोन कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्माची कामगिरी अत्यंत निरशाजनक राहिली होती. मात्र त्यानंतर खेळवल्या गेलेल्या मालिकेत रोहित आणि विराट कोहली यांचा थोड्या प्रमाणात दिसून आला. रोहित शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावत आपल्या जुन्या फॉर्ममध्ये पुनरागमन केले आहे. आज होणाऱ्या बांग्लादेशविरुद्धच्या समन्यात भारत ३ फिरकी गोलंदाज आणि २ वेगवान गोलंदाजांच्या भूमिकेत मैदानात उरण्याची शक्यता आहे.
हर्षित राणा बाहेर बसण्याची शक्यता
हर्षित राणा याने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात जरी चांगली कामगिरी केली असली तरी, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग यांना संघात संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे. दुबईच्या मैदानावर शमीच्या गोलंदाजीला वाव मिळण्यासाठी मदत होणार आहे. अर्शदीप मध्ये सुरुवातीचे विकेट्स घेण्याची प्रवृत्ती असल्याने आणि डेथ ओव्हर्स गोलंदाजी कौशल्यामुळे त्याला राणाच्या पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारी दुपारी सामना रंगणार असून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारीला मुसळदार पाऊस झाला होता. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात पाऊस पडणार नाही अशी अपेक्षा सर्वांना आहे. तरी देखील हवामानाचा अंदाज टीम इंडियाच्या निवडीवर परिणाम करू शकतो.
भारताची अंदाजित इलेव्हन: रोहित शर्मा ( कर्णधार ) शूबनम गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
बांगलादेश : नजमुल हुसेन शांतो (क), सौम्या सरकार, तन्झिद हसन, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, जाकेर अली अनिक, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा
प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी