अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाहिकेचा बोजवारा

श्रीरामपूर : महाराष्ट्र राज्यामध्ये रोड अपघात व ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची, वैदयकिय सेवा देण्यासाठी सरकारने सुरु केलेली “१०८ अम्ब्युलन्स” सेवा नगर जिल्ह्यात फक्त नावापुरती राहिली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात अम्ब्युलन्स सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे पहायला मिळत आहे.
अहमदनगर जिल्हा १४ तालुके आहे. तसेच शिर्डी व शनिशगापुर, सारखे मोठे देवस्थान आहे. या सर्व तालुक्यात प्रत्येक ठिकाणी एक गाडी देण्यात आली होती. पंरतु आज रोजी नगर जिल्ह्यात केवळ दोन गाड्या सुरु असल्याचे चित्र आहे. बाकी गाड्या बंद अवस्थेत असल्याचे पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अपघात झाल्यावर १०८ गाडी न पोचल्याने अनेक रूग्ण दगावले आहे.
सरकारने कोटी रुपये खर्च करून ही योजना ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबवली. परंतु ती सेवा ग्रामीण भागातील जनतेला हि सेवा मिळतच नाही.
पंरतु नगरमध्ये ही योजना आज रोजी पुर्णपणे मोडकळीस आली असल्याचे चित्र आहे. १०८ हि सेवा, बिव्हिजी गुप या खाजगी कंपनी चालवते. त्यामुळे नगर जिल्ह्यात ही सेवा पुन्हा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा