केंद्र सरकारने जीएसटी कर प्रणालीत केलेल्या नव्या बदलांमुळे येणाऱ्या दसरा, दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात कपड्यांच्या खरेदीवर थेट परिणाम होणार आहे. या नवीन नियमांमुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला तरी, उच्चभ्रू आणि ब्रँडेड कपड्यांची खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.
नव्या नियमानुसार, २,५०० रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर आता केवळ ५ टक्के जीएसटी असेल. यामुळे शर्ट, जीन्स किंवा साडी यांसारख्या सामान्य दरातील कपड्यांची किंमत सुमारे १४० रुपयांपर्यंत कमी होणार आहे, जो सणासुदीत गोरगरीब नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे.
मात्र, याच वेळी सरकारने २,५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून थेट १८ टक्के केला आहे. याचा अर्थ, आता ब्रँडेड, डिझायनर आणि महागडे कपडे खरेदी करणे अधिक महाग होणार आहे. उदाहरणार्थ, ३,००० रुपयांची साडी आता पूर्वीपेक्षा जास्त किमतीला खरेदी करावी लागेल. ‘हाऊस ऑफ सेलिब्रेशन’चे संचालक दादा गुजर यांनी स्पष्ट केले की, या निर्णयामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीयांना फायदा होईल, पण उच्चभ्रू ग्राहकांना ‘भारी’ कपड्यांवर जास्त पैसे मोजावे लागतील. थोडक्यात, ‘भारी कपडा शरीरावर शोभेल, पण जीएसटी मात्र खिसा कापणार’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे











































.jpeg?updatedAt=1739169786416)
