सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठा बदल घडला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे जिल्ह्यातील राजकीय तणाव संपल्याचे चित्र दिसत आहे. सावंतवाडी येथील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यातील दुरावा मिटवण्यासाठी शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतले. यापूर्वी राजन तेली यांनी नितेश राणे यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेबाबत टीका केली होती, पण निलेश राणे म्हणाले की, चुकीच्या गोष्टी दिसल्या तर ते दुरुस्त केले जातील.
सिंधुदुर्गमध्ये आता तीन मोठे नेते एकत्र आले आहेत, त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बदलू शकतात. राजन तेली यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली होती, पण आता हा विषय संपला आहे. निलेश राणे यांनी सांगितले की, महायुती झाली तरी ठीक, नाही झाली तर स्वतंत्र लढणार आहेत.
राजन तेली यांनीही सांगितले की, जो ज्या पक्षात आहे, त्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात चालते, आणि बँक टिकावी ही त्यांची इच्छा आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्रुटी लक्षात आणली असून, निर्णय वरिष्ठ घेतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































