शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंगच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या आठ दिवसापासून धंगेकर यांनी मोहोळ यांच्याविरुद्ध आरोपांची मालिका सुरू ठेवली आहे.
काल रात्री मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांना बोलावले असावे, कारण जैन मंदिर हडप झाल्याबाबत जैन धर्मीयांमध्ये असंतोष आहे. जैन समाजाची भावना तीव्र आहे आणि त्यामुळे मोहोळ यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी फडणवीसांनी हे पाऊल उचलले असेल, असे धंगेकर यांनी सांगितले.
धंगेकर यांनी असेही म्हटले की, देवेंद्र फडणवीस चुकीच्या लोकांना सोडणार नाहीत. चाणाक्ष राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, आणि त्यांच्याकडून योग्य कारवाई होईल, असा त्यांचा विश्वास आहे.
दरम्यान, एकीकडे रवींद्र धंगेकर भाजपच्या नेत्यांवर टीका करत आहेत. निलेश घायवळ प्रकरणानंतर आता जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहारा प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्यावर तीव्र टीका केली आहे. दुसरीकडे, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची खुलेपणाने स्तुती केली आहे.
धंगेकर यांच्या टीकेनंतर महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. फडणवीसांवर स्तुती केल्याने नवीन राजकीय चर्चांना गती मिळाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील










































.jpeg?updatedAt=1711026182113)
