15 हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले

घरकुल मंजूर करून देण्यासाठी मागितली होती 15 हजाराची लाच

भंडाराच्या मोहाडी तालुक्यातील विहीरगाव ग्रामपंचायत येथील एका व्यक्तीचा घरकुल करीता पहिल्या टप्प्याच्या यादीत नाव मंजूर करण्याकरिता ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी (46) यांनी 15 हजार रुपयांची लाच मागितली होती, याप्रकरणी संबंधित व्यक्तीने भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विहीरगाव ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला असता ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याला 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे, पुढील कारवाई सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: भंडारा नितीन कुथे