कोरोनाच्या काळात भारतासाठी एक दिलासादायक बाब

नवी दिल्ली,५ जुलै २०२० : देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे २२ हाजार ७७१ रुग्ण वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव दिसून येत आहे. तर भारत सध्या कोरोनाच्या बाबतीत सर्व विक्रम मोडीत काढत आहे.

भारताची एकूण कोरोना रुग्ण संख्या ६ लाख ४८ हजार ३१५ वर पोहचली आहे. तर गेल्या २४ तासात ४४२ जणांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंत ३ लाख ९४ हजार २२६ रुग्ण बरे झाले असून २ लाख ३५ हजार ४३३ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. ३ जुलैपर्यंत देशात ९५ लाख ४० हजार १३२ चाचण्या घेण्यात आल्या आहे तर गेल्या २४ तासात २ लाख ४२ हजार ३८३ चाचण्या घेण्यात आले आहेत.गेल्या २ दिवसापासून देशात हे रुग्ण २० हजारापेक्षा अधिक संख्येने वाढत आहे.

१ जूनपासून आता पर्यंत ४ लाख ५७ हजार ७८० रुग्ण वाढले आहेत. गेल्या २४ तसांत महाराष्ट्रात १९८,तमिळनाडूत ६४,दिल्ली ५९,कर्नाटक २१,गुजरात व पश्चिम बंगाल मध्ये प्रत्येकी १८ कोरोनामुळे विविध राज्यात रुग्ण दगावले आहेत. तर यामधील सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र राज्यात झाले आहेत.

देशात रुग्ण संख्या वाढीचे प्रमाण जास्त असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आहे असे केंद्रीय अरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६०.८० टक्के आसल्याचेही आरोग्य विभागाच्या आधिका-याने सांगितले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जास्त असले तरी भारत येत्या काही दिवसात रशियाला मागे टाकत चौथ्या स्थानावरुन तिस-या स्थानावर जाणार आसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा