अवघ्या तीन वर्षाच्या मुकबधीर मुलाला रेल्वेमध्येच सोडून गेली आई

ग्वालियर, १३ ऑक्टोंबर २०२२: प्रत्येक आईचे आपल्या मुलांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम असते. आपल्या  मुलांसाठी  ती काहीही करू  शकते. आईचे  प्रेम आणि तिने आपल्या  मुलांसाठी केलेला त्याग यांची  तुलना कशाशीही करता येणे कठीण आहे. मात्र  मध्यप्रदेशात नुकतीच एक  हृदय पिळवटून टाकणारी घटना  घडली आहे. गरिबीमुळेआईला एक कठोर निर्णय घ्यावा लागला आहे.
       
मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील एका महिला काळजावर दगड ठेवून आपल्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलाला ट्रेन मध्येच सोडून गेली. या वेळी तिने आपल्या  मुलासह एक भावुक चिट्टीही ठेवली आहे. आपल्या गरिबीमुळे  तिला हा निर्णय  घ्यावा लागल्याचं तिने  यामध्ये म्हटलं आहे. या  पत्रात तिने तिची  परिस्थिती आणि  मुलांचे पालनपोषण करण्यामध्ये येणाऱ्या अडचणीचा उल्लेख  केला आहे. 
   

या महिलेने आपल्या मुलाला ग्वालियर-रतलाम एक्सप्रेसच्या  एका  डब्यात  सोडले. दरम्यान,  या  महिलेने जे प्रत्र लिहले आहे. ते वाचून तुम्हीही भावुक  व्हाल.
या महिलेने आपल्या पत्रात लिहिलंय  माझ्या पतीचे निधन  झाले असून  आम्हाला चार मुलं आहेत. माझे बाळ फक्त दुध पिते. मात्र  मी माझ्या मुलांसाठी  दुधही विकत घेऊ  शकत नाही. कारण  माझ्या कडे इतकेही पैसे नाहीत. माझ्यासाठी तीन मुलांचे पालनपोषण करणेच खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत मी या चौथ्या मुलाच्या सांभाळ कसा करू?  त्यामुळे नाईलाजाने मला याला इथे  सोडून जावे लागत आहे. या मुलाला अनाथालयातही कोणी घेत नाही. ज्यालाही हे पत्र मिळेल, त्यांना मी विनंती करते की, त्यांनी माझ्या बाळाला अनाथालयात पोहचवावे.
  

या एकट्या मुलाला पाहून प्रवाशांनी लगेचच टीसीला याबद्दल माहिती दिली. यानंतर या  मुलाला पाहण्यासाठी लोकानी  गर्दी केली.  ट्रेन ग्वालियर स्टेशन पोहोचतात चाईल्ड लाईन टीमला बोलवण्यात आले. दरम्यान अधिकाऱ्यांनी या मुलाला लहान  मुलांच्या शिशू गृहात पाठवले असून त्याच्या आईचा शोध घेतला जात आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहिती नुसार ही महिला स्टेशन वर उतरली या बाबत कोणालाही माहिती नाही. मुलाची वैद्यकीय  चाचणी  केल्यानंतर तो मूकबधिर असल्याचे स्पष्ट  झाले आहे.
   
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रकाश जगताप.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा