जेजुरी मोरगाव रस्त्यावर कारने महिलेला उडविले, महिलेचा मृत्यू

पुरंदर, ३ जानेवारी २०२१: पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे जेजुरी मोरगाव रस्त्यावर डोक्यावर उसाची मोळी घेऊन जाणाऱ्या महिलेला अज्ञात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उडविले .या अपघातात गंभीर झालेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे .

या अपघातात कविता संजय जगताप वय ३८ रा जवळार्जुन ता पुरंदर जी पुणे या महिलेचा मृत्यू झाला. या अपघाता बाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जवळार्जुन येथे राहणारे संजय भगवान जगताप यांचा जेजुरी मोरगाव रस्त्यावरील जवळार्जुन फाट्यावर उसाच्या रसाचा गाडा आहे. या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे. संजय जगताप व त्यांच्या पत्नी कविता संजय जगताप वय ३८ हे हा रसाचा गाडा चालवितात.

आज शनिवार दि २ जानेवारी रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कविता जगताप या उसाची मोळी आणण्यासाठी गेल्या. दुपारी चार वाजता डोक्यावर उसाची मोळी घेऊन रस्ता क्रॉस करताना एका भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात कार ने कविता यांना उडविले, कार चालक न थांबता गाडी घेऊन पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला. अशी फिर्याद महिलेचे पती संजय जगताप यांनी जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.

या अपघात प्रकरणी पोलीस हवालदर गणेश दाभाडे तपास करीत आहेत .

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा