दिल्ली महापालिकेत ‘आप’ची मोठी मुसंडी; बहुमताचा आकडा पार

दिल्ली, ७ डिसेंबर २०२२ : दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरवात झाली. आतापर्यंत एकूण २५० जागांपैकी १३२ जागा घेऊन आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. तर भाजपला १०४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसने १० जागा जिंकल्या आहेत.

तर इतरांना ४ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, ‘आप’ने बहुमताचा आकडा पार केल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार अरिबा खान यांनी अबुल फजल यांचा पराभव केला आहे. काँग्रेसने जकीरनगरची जागा ताब्यात घेतली आहे. तर भाजपने सरस्वती विहार, पश्चिम विहार आणि राणीबाग या तिन्ही जागा जिंकल्या आहेत.

आम आदमी पक्षाचे उमेदवार बॉबी किन्नर यांनी सुलतानपुरी प्रभागातून निवडणूक जिंकली आहे. ‘आप’चे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले, की बहुमताचा आकडा पार केल्याने ‘आप’च्या कार्यालयात आनंदाचे वातावरण असून, आम्ही १८० हून अधिक जागांवर विजय मिळवू.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा