ऑस्ट्रेलियाला पहिला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या आरोन फिंचची क्रिकेटमधून निवृत्ती

मेलबर्न, ७ फेब्रुवारी २०२३ :ऑस्ट्रेलियन संघाचा टी- २० कर्णधार आरोन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर आहे. येथे चार कसोटी सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियन टीम भारतात असताना, त्यांच्या कॅप्टनने निवृत्तीची घोषणा केली आहे.

संघाचा सलामीवीर आणि तुफानी फलंदाज फिंचने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटला यापूर्वीच अलविदा केले आहे. आता त्याने टी- २० देखील खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. फिंच ऑस्ट्रेलियाचा टी- २० मधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. २०२२ मध्ये दुबई येथे फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला टी- २० विश्वचषक जिंकला होता.

फिंचने ऑस्ट्रेलियाचे सर्व फॉरमॅटमध्ये २५४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले, त्यात पाच कसोटी, १४६ एकदिवसीय आणि १०३ टी- २० सामने खेळले आहेत.

  • फिंच म्हणाला,

यावेळी फिंच म्हणाला, मी २०२४ च्या पुढील टी- २० विश्वचषकापर्यंत खेळणार नाही, हे लक्षात घेऊन, पद सोडण्याची आणि त्या स्पर्धेसाठी संघाला वेळ देण्याची हीच योग्य वेळ आहे. याशिवाय, तो म्हणाला की, माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्या चाहत्यांनी मला पाठिंबा दिला, त्यांचेही मी खूप आभार मानू इच्छितो.

  • स्टार खेळाडू फिंच

२०२० मध्ये फिंच मला ICC पुरुष टी – २० क्रिकेटर ऑफ द डिकेड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याने २०१८ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वे विरुद्ध फक्त ७६ चेंडूत १७२ धावा करून टी – २० मधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला, ज्यामध्ये १० षटकार आणि १६ चौकारांचा समावेश होता. याशिवाय २०१३ मध्ये साऊथम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध ६३ चेंडूत १५६ धावा केल्या होत्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा