अब्दुल रहमान मक्की दहशतवादी घोषित; थेट तुरुंगातून व्हिडीओ केला जारी

नवी दिल्ली, २० जानेवारी २०२३: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदने पाकिस्तानमधील हाफीज सईदचा कट्टर समर्थक दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला दहशतवादी घोषित केल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. अब्दुल रहमान मक्कीने को लाहोरच्या कोट लखपतच्या जेलमधून एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये मक्की ने अल-कायदा किंवा इस्लामिक स्टेटशी त्याचे कुठलेही सबंध नसल्याचे सांगितले आहे.

अब्दुल रहमान मक्की व्हिडिओत म्हणाला की, ‘कधीही अलकायदा प्रमुख ओसामा बिन लादेन, अयमान अल-जवाहिरी आणि अब्दुल्ला आजम ची कधीही भेट घेतली नाही. हा सर्व प्रोपोगंडा आहे’.

अल-कायदा प्रतिबंध समितीनुसार त्याला जागतिक दर्जाच्या यादीत सूचीबद्ध केले आहे. गेल्या वर्षी चीनने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकायला विरोध केला होता.

तर भारत आणि अमेरिकेने आधीच त्यांच्या देशांतर्गत कायद्यांतर्गत मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. तो निधी उभारण्यात, तरुणांना हिंसाचारासाठी भरती करण्यात आणि कट्टरपंथी बनवण्यात आणि भारतात, विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ले घडवण्यात गुंतलेला आहे. मक्की हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि २६/ ११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेव्हणा आहे. यूएस-नियुक्त विदेशी दहशतवादी संघटना लष्करमध्ये त्याने विविध नेतृत्व भूमिका केल्या आहेत. लष्करच्या कारवायांसाठी निधी उभारण्यातही त्याची भूमिका आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा