आदर्श घोटाळा चौकशी सुरू; अशोक चव्हाण अडचणीत ?

21

मुंबई : राज्यात महाआघाडीच्या सरकारचा आज शपथविधी शिवाजी पार्कवर होणाार आहे. शिवसेना, राष्ट्रावादी आणि काँग्रेससह मित्रपक्षांच्या या आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आहे. गुरुवारी उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे दोन मंत्री शपथ घेतील असे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या या मंत्रिमंडळात काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा शपथ घेतील.
मात्र, शपथविधीआधीच अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आदर्श सोसायची घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा चौकशी सुरु केली आहे. बुधवारी कुलाब्यातील आदर्श सोसायटीमध्ये ईडीचे पथक पोहचले.

कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याप्रकरणी घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं नाव अडकलं आणि त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. आदर्श घोटाळा २०१०मध्ये समोर आला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा