गोल पोस्ट राजकारण आदित्य ठाकरे रात्रभर शिवसेनेच्या आमदारांसोबत

आदित्य ठाकरे रात्रभर शिवसेनेच्या आमदारांसोबत

मुंबई, मालाड: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे रात्रभर मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये आमदारांसोबत आहेत. शिवसेनेच्या आमदारांसोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुद्धा रिट्रीट हॉटेल मध्ये थांबून आहेत. भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेकडून ही खबरदारी घेण्यात येत आहे की कुठलाही दगाफटका होऊ नये. त्यामुळे सर्व आमदारांना एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
रात्री साडेबारा वाजता आदित्य ठाकरे मातोश्रीवरून रिट्रीट हॉटेल कडे रवाना झाले होते. मध्यरात्री आमदारांसोबत मिटिंग झाली. राज्यपालांकडून भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने हालचालींना वेग आला आहे. मीटिंगमध्ये बहुदा आज दिवसभराच्या कामकाजाविषयी चर्चा झाली असावी. रात्री मीटिंगमध्ये काय बोलणी झाली ते आज दिवसभरात समजेल. दोन्ही पक्षांकडून आज मोठ्या वाटाघाटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजचा दिवस हा मोठ्या घडामोडींचा असेल.

error: Content is protected !!
Exit mobile version