आफ्रिदीला झाली कोरोनाची लागण

इस्लामाबाद, दि. १४ जून २०२०: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीची कोरोना टेस्ट झाली होती. त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे. आफ्रिदीने शनिवारी स्वतः ट्विट करून असे सांगितले की जनतेनी मी लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करावी.

यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ट्विटरवरुन आफ्रिदी लवकर बरा व्हावा म्हणून सदिच्छा व्यक्त केली. आफ्रिदीचे सहकारी खेळाडू शोएब अख्तर, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, कामरान अकमल यांच्यासह अनेक खेळाडू सतत त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

दुसरीकडे आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की कोणालाही या विषाणूची लागण होऊ नये. माझी आणि आफ्रिदीची राजकीय विचारसरणी कदाचित वेगळी असू शकते, पण शाहिद आफ्रिदी लवकरच निरोगी होवो अशी माझी इच्छा आहे.

४० वर्षीय आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द ३९८ वनडे, ९९ टी -२० आंतरराष्ट्रीय आणि २७ कसोटी सामने अशी आहे. आफ्रिदीने (४७६) तीनही आंतरराष्ट्रीय स्वरूपात ख्रिस गेल (५३४) नंतर सर्वाधिक षटकार लगावले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा