वर्क फ्रॉम होम नंतर आता सुरू होणार वर्क फ्रॉम पब

पुणे, १५ ऑक्टोंबर २०२२: वर्क फ्रॉम होम या संकल्पनेशी आपण सगळेच परिचित आहोत. खासकरून २०२० मध्ये जेव्हा जगावर कोरोनाचं संकट आलं तेव्हापासून या कार्यपद्धतीला जास्त वाव मिळाला. लोकांना ऑफिस मधे जाता येत नसल्याने घरातूनच काम करण्याची संधी मिळाली होती. आणि अजूनही काही ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरूच आहे.

पण आता जर तुम्हाला ‘वर्क फ्रॉम पब’करण्याची संधी मिळाली तर? आणि तेही स्पेशल पॅकेज सोबत, ज्या मधे फूड, ड्रिंक्स आणि वायफाय हे अनलिमिटेड असेल. खूप कमी लोक असतील जे ह्या ऑफर ला नाही म्हणतील. ही सेवा आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

ब्रिटन पब चे संचालक, ही नवीन अनोखी कल्पना असलेली सेवा सुरू करणार आहेत. आणि त्यात वेगवेगळया डील असणार आहेत. ब्रिटन मधे पब्स ची वाढती संख्या लक्षात घेऊन त्याचा महसूल वाढवण्यासाठी वर्क फ्रॉम पब ही ऑफर सुरू करण्यात येत आहे. त्यांच्या मते ब्रिटन मधे कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढल्याने, लॅपटॉप घेऊन काम करणारे लोक लाईट बिल वाचवण्यासाठी पब मधे येऊन काम करू शकतात. या पॅकेज ची सुरुवात ९०० रुपयां पासून असेल, ज्यात तुम्हाला लंच, ड्रिंक्स मिळू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा