मुंबई ८ डिसेंबर २०२३ : देशात अनेक राज्यात विज्ञानावर काम करणारी अगस्त्य इंटरनॅशनल फौंडेशन या संस्थेच्या वतीने मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात मा.नामदार,मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते क्रियाधी संच वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंत्रीमहोदय यांनी विदयार्थ्यांनी तयार केलेले मॉडेल, विविध वैज्ञानिक किट, अगस्त्याची प्रकाशने यांच्या प्रदर्शनाला भेट देत पाहणी केली. यावेळी विविध विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी आपले अनुभव कथन करत त्यासंदर्भात माहिती सादर केली.
अगस्त्यामुळे आमच्यात खुप मोठा बदल झाला, आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे तसेच कुप्पम म्हणजे शिक्षकांसाठी पंढरी असून कुप्पमला जाऊन आल्यावर शिक्षकांचा दृष्टीकोन व्यापक होत असून तो विद्यार्थी केंद्रीत शिक्षण, कृतियुक्त शिक्षण असा होत आहे, असे मत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मांडले. अगस्त्याच्या वतीने राबवण्यात येणारे विविध उपक्रम हे नाविन्यपूर्ण तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचं मत देखील मा.मंत्री अतुल सावे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. भारतातील, महाराष्ट्रातील अगदी तळागळातील विदयार्थ्यांपर्यंत अगस्त्या मार्फत विविध तंत्रज्ञान, विज्ञान, शिक्षण पोहोचत असून हे शिक्षण त्यांच्या पुढील जीवनासाठी खूप उपयोगी असणार आहे. यामुळे विदयार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नवनिर्मिती, कियाशिलता, समस्या निराकरण अशी कौशल्य निर्माण होत आहेत.
विद्यार्थी आपल्या परिसरातील समस्या घेऊन त्यावर मॉडेल बनवतात याचा फायदा समाजाला देखील मोठया प्रमाणात होइल. अगस्त्याचा Design Thinking हा प्रोग्राम अतिशय फायदेशीर तसेच आजच्या काळानुसार गरजेचा, विदयार्थ्यांला सक्षम बनवणारा असून ग्रामीण भागात याचा मोठया प्रमाणात विस्तार करण्यासाठी आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, अशा शब्दात मा. मंत्री महोदय यांनी यावेळी आश्वासन दिले. याप्रसंगी अगस्त्या फौंडेशनचे महाव्यवस्थापक डॉ.संदीप देशमुख सर, आय.आय.टी इनोवेटर्सचे अमित मोदी सर, अगस्त्यचे महाराष्ट्र विभाग प्रमुख पराग सावंत सर तसेच विदयार्थी, शिक्षक, पालक, टीम अगस्त्या उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गणेश म्हाप्रळकर