सरकार आहे युतीचे
वांदे आहेत शेतीचे
मजा करतील व्यापारी
शेतकरी होईल भिकारी
लोकशाहीचा राजा परदेशात उडतोय
भारताचा शेतकरी कर्जात बुडतोय
सबका साथ सबका विकास
इथला शेतकरी झालाय भकास
करतात फक्त काशी काशी
शेतकरी घेतोय रोजच फाशी
– संदीप राऊत -पुणे.