आत्महत्या मजबुरी आहे कि ट्रेंड ?

एका मुलाने आत्महत्या केली. तो स्वतः मोटिवेशनल व्हीडिओ बनवायचा आणि त्यानेच आत्महत्या केली त्यामुळे बहुतेक जणांचा चर्चेचा विषय बनला आहे..

जनरली सोशल मीडिया हे आपण किती सुखात आहोत आपण आयुष्य किती एन्जॉय करतोय हे दाखवायचे माध्यम बनवले गेले आहे. कोणीच आपल्या समस्या याठिकाणी मांडत नाही. मांडणारे खूप मोजके लोक असतात तेही अगदीच खूप अडचणीत आल्यावर बोलतात. आणि त्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. सोशल मीडियाच आयुष्य आणि वास्तवाचं जगणं याचा मेळ खूपच कमी लोकांचा लागतो.

आपण लिहितोय, बोलतोय ते नक्की कशासाठी ? ते आपले स्वतःचे आत्मचिंतन आहे की सेलिब्रिटी बनावे म्हणून किंवा लोकांना आवडते म्हणून आपण हे करत आहोत. हे आपल्याला समजलं पाहिजे. आपले वाचन किती ? हा प्रश्न तर निदान नक्कीच स्वतःला एखाद विचार मांडताना विचारायला हवे…

आयुष्य हे कुठल्याही एकाच मूल्यांवर चालणारी गोष्ट नाही. आयुष्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीशी लढले पाहिजे वगैरे हा विचार वेडेपणाचा आहे. बऱ्याच वेळेला लढत बसण्यापेक्षा शांत बसलेले उत्तम असते. अशाने समस्या येते आणि निघूनही जाते. उगाच नाही तिथे एनर्जी वेस्ट करत बसू नये माणसाने.

माणसाचे आयुष्य आधीच अल्प आहे. त्यात कुठल्याही कारणाने आत्महत्या करण्यात अर्थ नाही. बर, तुमच्या आत्महत्या केल्याने कोणालाही काहीही फरक पडत नसतो. लोक कोणाच्याही विना जगत असतात अगदी कोणाच्याही. फक्त तुमचं जगणं संपत एवढाच काय तो आत्महत्येचा परिपाक…

समजलं तर ठीक…

– पैगंबर शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा