अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस, सोयाबीन आंदोलन

अकोला, २३ फेब्रुवारी २०२४ : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा व केंद्र सरकारने ‘एमएसपी’ चा कायदा करावा या प्रमुख मागण्यासाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस, सोयाबीन आंदोलन करण्यात आले. याकरिता बैलबंडी आणून कापूस आणि सोयाबीन रस्त्यावर टाकून प्रतीकात्मक निषेधही व्यक्त करण्यात आला.

कापसाला आणि सोयाबीनाला आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. याची दखल घेत काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी बैलबंडी आणून कापूस आणि सोयाबीन रस्त्यावर टाकून प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला. दिल्लीतील शेतकऱ्यांवर सुरू असलेल्या अश्रुधुराचा मारा थांबवून आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना शहिदांच्या दर्जा देण्यात यावा, तसेच जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना विम्याची २५ टक्के अग्रीम मिळाली नाही ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्याने १०० टक्के पीक विमा मंजूर करावा तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले त्यांना भावांतर योजनेतून अनुदान देण्यात यावे याकरिता काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

न्युज अनकट प्रतिनीधी : शाहिद इकबाल

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा