कल्याण, ९ सप्टेंबर २०२०: महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप तरी कमी झालेला नाही. अनेक ठिकाणी रूग्णांच्या सख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच कोल्हापूरमध्ये सूद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून एक सुसज्ज रुग्णवाहिका छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशनला दिली आहे.
नागरिकांना रुग्णवाहिकेसाठी रत्यावर भटकावे लागत आहे. रुग्णवाहिकेचा तूटवडा हा सातत्याने भासताना दिसत आहे आणि रुग्णवाहिका वेळेवर न भेटल्याने अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना सातत्याने होत असल्याने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून ही मदत छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशनला करण्यात आली. मंत्री संभाजी राजे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
कोल्हापूरसाठी रुग्णवाहिका देणार असा शब्द खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला होता. त्यांनी अखेर एका आठवड्याच्या आत दिलेला शब्द खरा केला आहे. त्यामुळे मंत्री संभाजी राजे यांनी याबद्दल आभार व्यक्त केले. छ. संभाजीराजे यांस रुग्णवाहिकेची चावी व कागदपत्रे सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे सामान्य नागरिकांना या रुग्णवाहिकेमुळे मदत होईल असे देखील म्हटले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर वरून ही माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे