चिनी उत्पादनांना लक्ष केल्यानंतर “अमुल”चे ट्विटर हँडल केले ब्लॉक

7

अहमदाबाद, दि. ७ जून २०२०: अमुल ब्रँडचे मालक असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे ट्विटर अकाऊंट चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे व्यंगचित्र दाखवलेल्या कार्टूननंतर थोड्या वेळाने अवरोधित (ब्लॉक) केले गेले.

जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोधी यांनी सांगितले की, ट्विटरने @Amul_Coop अमुलचे ट्विटर हँडल ब्लॉक केले होते. जाहिरात एजन्सीने “एक्झिट द ड्रॅगन” ( exit the Dragon) या मथळ्यासह ‘अमूल गर्ल’ असे एक व्यंगचित्र पोस्ट केलेले होते. हे व्यंगचित्र गुरुवारी रात्री पोस्ट केले गेले होते. उजव्या कोपऱ्यात तळाशी असलेल्या जाहिरातीमध्ये “अमूल मेड इन इंडिया” असे शब्द होते.

यात ट्विटर हँडलवर पूर्वेकडील लडाखमधील उभय देशांमधील भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या नवीन धोरणाला तसेच भारतीय सोशल मीडियावर चीनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनास प्रतिसाद देणारे व्यंगचित्र दाखवले. शनिवारी दुपारी तपासणी केल्यावर अमूलच्या ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आणि व्यंगचित्र असलेली पोस्टदेखील दिसत होती.

“ट्विटर कडून आम्हाला कोणतेही अधिकृत निवेदन मिळालेले नसल्याने हे खाते का ब्लॉक केले गेले हे आम्हाला माहित नाही अमूलने कुणाविरूद्ध कोणतीही मोहीम राबविली नाही” असे सोधी म्हणाले.

“गेल्या ५५ वर्षांपासून ‘अमूल गर्ल’ मोहीम सुरू आहे आणि आमचा मस्कॉट सामान्यपणे ठराविक विषयावर आधारित विषयांविषयीच बोलतो, जो देशाच्या मनाची भावना एक मजेदार पद्धतीने प्रतिबिंबित करतो, “असे सोधी म्हणाले.

“जेव्हा आमच्या जाहिरात एजन्सीने ४ जूनच्या रात्री ही जाहिरात सामायिक केली तेव्हा आमचे ट्विटर खाते ब्लॉक केले गेले असल्याचे एका फॉरवर्डद्वारे समजले. आम्ही ट्विटरला पुन्हा सक्रिय करण्यासाठी विनंती केली, तेव्हा खाते पुनर्संचयित केले, ट्विटरने आमच्या ट्विटर हँडल वर अशी कारवाई का केली याबाबत ट्विटर कडून कोणतेही निवेदन आम्हाला मिळालेले नाही किंवा त्यांनी असे का केले याबाबत देखील कोणतेही स्पष्टीकरण त्यांच्याकडून मिळालेले नाही. ” असे ते म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा