पुण्यात एक दुर्दैवी घटना, भरवस्तीत आग लागल्याने सहा वर्षाच्या मुलीचा मृत्यु

पुणे, २२ ऑक्टोबर २०२२: दिवाळीच्या उत्साहाच्या वातावरणात पुण्यात आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका सहा वर्षाच्या मुलीचा आगीत भाजल्याने मृत्यु झाला आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेत एका हॉटेलला आज सकाळी आग लागली होती.

ही आग एवढी मोठी होती की आगीचे लोट चे लोट बाहेर पडत होते. स्थानिक नागरिकांनी आग लागली असल्याचे समजताच अग्निशामक दलाला सांगितले, अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी पोहचले आणि आगीवर नियंत्रन मिळविले. या घटनेत तीथेच राहणारी एक सहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली होती.

या मुलीला अग्निशामक दलाने ताबडतोप बाहेर काढले आणि त्यानंतर खाजगी वाहणाने तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू मुलगी गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.

इकरा नईम खान असे घटनेत मृत्यु झालेल्या मुलीच नाव आहे. या प्रकरणी सदाशिव पेठेतील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा