गोल पोस्ट क्रीडा चेन्नई सुपर किंग संघाला आणखी एक फटका – हा खेळाडू आयपीएल...

चेन्नई सुपर किंग संघाला आणखी एक फटका – हा खेळाडू आयपीएल मधून बाहेर…

नवी दिल्ली, २९ ऑगस्ट २०२०: आयपीएल येत्या १९ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. चेन्नई संघाचा उत्कृष्ठ खेळाडू सुरेश रैना याने काही कारणास्तव आयपीएल मधून माघार घेतली आहे. तसेच कोणत्या कारणामुळे तो परतला आहे, याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

कोरोनाचे सावट असल्यामुळे यंदाची आयपीएल सप्टेंबर महिन्यात यूएई मध्ये आयोजित करण्यात आली आहे. तसेच सर्व संघ दुबई मध्ये पोहोचले आहेत. त्यात चेन्नई संघाच्या खेळाडूंची कोव्हीड चाचणी केली असता ती पॉजिटिव आली आहे. तसेच त्यांना पुन्हा एक आठवड्यासाठी क्वारंटीन करण्यात आले आहे.

यावेळी कमेंटर हर्षा भोगले यांनी आपली प्रतिक्रिया दिली ज्यात ते म्हणाले की, सुरेश रैना यांच्या परत जाण्याने चेन्नई संघाला खूप मोठा झटका बसला आहे. तसेच एका ट्विट मध्ये ते म्हणाले की, मला नाही माहित ते कोणत्या कारणास्तव माघारी गेले आहेत. परंतू त्यांच्यासोबत संवाद साधल्यावर दिसून येत होते की त्यांना चांगला परफॉर्म करायचं होतं”.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version