अमेरीकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत आणखी एक भारतीय वंशाचा चेहरा

अमेरिका, ३० जुलै २०२३: मुळचे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले हर्षवर्धन सिंग हे सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाचे नवीन दावेदार मानले जात आहेत. हर्षवर्धन सिंग हे एरोस्पेस अभियंता असून, त्यांनी मी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरत आहे. अशी माहिती त्यांनी सांगितले आहे.

पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. त्यांची जय्यत तयारी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आतापासून सुरू केली आहे. दरम्यान भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले सिंग यांनी देखील नशिब आजमावायचे ठरवले आहे. निक्की हेली आणि विवेक रामास्वामी यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत सामील होणारे सिंग हे तिसरे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक ठरले आहेत.

अमेरिकेची मूल्ये रुजवण्यासाठी कणखर नेतृत्व लागते. आमच्यावर राजकीय दृष्टीकोनातून सेन्सॉरशिप लादली जात आहे, असे ते म्हणाले. या सर्व कारणांमुळेच मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झालो आहे, असेही हर्षवर्धन सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा