आणखी एक “सुपर संडे’ IND v PAK आज पुन्हा एकदा आमने-सामने

6

पुणे, ४ सप्टेंबर २०२२: आज दुबईत आशिया चषकात भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होणार आहे. आज पुन्हा एकदा हा महामुकाबला होणार आहे.  सुपर ४ राउंडमधील हा सामना असणार आहे. भारत पाकिस्तानचा सामना म्हटले की अवघ्या जगाचं लक्ष या सामन्याकडे लागलेलं असतं.

पहिल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं. आताच्या सामन्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. रविंद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. जसप्रीत बुमरालाही दुखापत झाली आहे. टीम इंडियाला विजय मिळवण्याचं मोठं आव्हान आज आहे.टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंना दुखापत झालीय. त्यामुळे टीममध्ये नवख्यांना संधी द्यावी लागणार आहे.

जडेजाची जागा कोण घेणार?

भारतीय संघात पहिला बदल हा रवींद्र जडेजाच्या जागेसाठी होणार आहे. जडेजाला दुखापत झाल्यामुळे आता तो या स्पर्धेत खेळणार नाही हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात जडेजाच्या जागी होणार आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संघात स्थान देण्यात आले आहे, पण त्याला या सामन्यात खेळवण्याची शक्यता कमी आहे.

कोच द्रविडने केलं स्पष्ट

मात्र, प्रशिक्षक द्रविडने प्लेइंग 11 मध्ये जडेजाच्या जागी एका खेळाडूची निवड केली आहे.’रविचंद्रन अश्विनसारखा खेळाडू संघात असणे खूप छान आहे, त्याच्याकडे चार ओव्हर टाकण्याची आणि बॅटिंग करण्याची क्षमता आहे. तसाच टी-२० सामन्यांमध्येही ऑफ-स्पिनर्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. बांगलादेश आणि श्रीलंकासारख्या संघांकडे उत्कृष्ट ऑफस्पिनर्स आहेत. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही त्यांचा वापर करू शकतो. द्रविडकडून मिळालेल्या या संकेतामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघात स्थान मिळवण्यासाठी अश्विनच प्रबळ दावेदार असल्याचं दिसतं आहे.

गेल्या सामन्यात अवेश खानबरोबर अर्शदीप सिंगही महागडा ठरला होता. गेल्या सामन्यात अर्शदीपला अचूक आणि भेदक मारा करता आला नव्हता. त्यामुळे त्याला या सामन्यात संघाबाहेर करण्यात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात अर्शदीपच्या जागी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय महत्वाचा असेल. कारण भारतीय संघाबाहेर अजूनही आर. अश्विन आणि दीपक हुडा आहेत. अश्विनकडे चांगला अनुभव आहे तर दीपककडे चांगला फॉर्म आहे. त्यामुळे आता या सामन्यात या दोघांपैकी कोणाला संधी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा