पुण्याच्या ‘माई बालभवन’ अंध मुलींच्या फुटबॉल टीम ने, वेस्ट झोनल वुमन्स ब्लाइंड फुटबॉल टूर्नामेंट मध्ये मिळवले उपविजेते पद.

तिरुवअनंतपुरम , १५ एप्रिल २०२३: फर्स्ट वुमन्स एडिशन् ऑफ द साउथ वेस्ट झोनल ब्लाइंड फुटबॉल टूर्नामेंट, तिरुवअनंतपुरम केरळ येथे भरवण्यात आली होती. या टूर्नामेंट मध्ये तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा हे सहा राज्य सहभागी होते.

अतिशय उत्साहात झालेल्या या स्पर्धेत, महाराष्ट्र (माई बाल भवन) आणि गुजरात यांच्या टीम मध्ये फायनल मॅच झाली. अटीतटीच्या सामन्यामध्ये गुजरातने महाराष्ट्र संघाला १/० ने हरवले. पुण्याच्या ‘माई बालभवन’ संस्थेच्या अंध मुलींची फुटबॉल टीम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्र टीम मधील सगळ्या खेळाडु ‘माई बालभवन’ संस्थेच्या आहेत.

या स्पर्धेत माई बालभवन संस्थेची कन्या ‘कोमल गायकवाड’ हीला बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड मिळाला. सर्व स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्राला फायनल मध्ये पोहचवले. महाराष्ट्र कडून खेळताना कोमल गायकवाड ही टीम ची कॅप्टन होती.

त्याच प्रमाणे दीपाली पवार, भाग्यश्री रुगी, स्वाती माने, सारिका बरुड, मुस्कान गुप्ता, वारोनिका आणि वैष्णवी या ‘माई बालभवन’ च्या मुली टीम मध्ये होत्या. या कामगिरी बद्दल महाराष्ट्राच्या या टीम चे आणि ‘माई बालभवन’ चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या वेळी जरी उपविजेते ठरलो असलो तरी पुढील महिन्यात झारखंड येथे होणाऱ्या स्पर्धेत चांगला खेळ करू असे कॅप्टन कोमल गायकवाड ने सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा