अंत्य संस्करास राजी

बहिणीची नोकरी, २५ लाखांची भरपाई आणि पक्के घराचे वचन सरकारने दिले आहे. उन्नाव येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा अंत्यसंस्कार तिच्या गावात करण्यात आला. पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री येईपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाहीत अशी मागणी केली होती. यावर पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुटूंबाशी बोलून अंत्यसंस्कारासाठी त्यांना मनावले. पीडितेचा शनिवारी सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री आवास निधीतून पीडित कुटूंबासाठी २५ लाखांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा