अहमदनगर, ०१ ऑगस्ट २०२२: महाविद्यालय म्हांटलं की दोन गट आणि वाद हे आलेच. पण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नेमक्या कोणत्या कारणावरून दोन विद्यार्थी गटामध्ये वाद झाला याचे कारण अद्यापही समोर आले नाही. मात्र, स्थानिक विद्यार्थी आणि शिक्षणासाठी परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.
येथील वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थीवर दगडफेक केली होती. त्यामुळे वातावरण गंभीर झाले होते.शिवाय हा प्रकार रविवारी पहाटे झाल्याने भांडण सोडवण्यासही कोणी नव्हते. अखेर सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी हस्तक्षेप करुन परगावच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात बसवले तर येथील स्थानिक विद्यार्थ्यांना शांत राहण्याचे आवहान केले.
भल्या पहाटेच विद्यार्थीमध्ये वाद निर्माण झाल्याने वातावरण गंभीर झाले होते. मोजक्या विद्यार्थीमधील वादाचा नाहक त्रास इतरांनाही झाला. तर अनेकजण आडोशाला
दबा धरुन बसले होते. अखेर सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यानी ठाण मांडून बसल्याने वाद अधिक चिघळला नाही. अन्यथा संतप्त विद्यार्थ्यांनी टोकाची भुमिका घेतली असती. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर वातावरण निवळले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर