मुंबई, ७ सप्टेंबर २०२०: सध्या कोरोनाने सारे जग ग्रासलं असून राजकारण्यांपासून ते कलाकांरापर्यंत सर्वांना कोरोनाची लागण होत आहे. तर अनेक राजकरणी आणि कलाकार यावर यशस्वी मात करून बरे देखील होत आहेत. मात्र कोरोना हा बाकी पाठ सोडायचे काही नाव घेईना. आता बाॅलिवूड मधील आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.
बाॅलिवूड चित्रपट सृष्टीमधील अभिनेता अर्जून कपूरला कोरोनाची लागण झाली असून त्याने हि माहिती आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्टवर शेयर करत दिली. “माझी कोरोना टेस्ट हि पाॅजिटिव्ह आली आहे.मी डाॅक्टरांच्या सल्ल्याने घरीच होम क्वारंन्टाईन झालो आहे.माझी तब्येत चांगली आहे”अशी माहिती त्यांने स्वत: दिली आहे.
मलायका आरोराला ही झाली कोरोनाची लागण
अभिनेत्री मलायका आरोरालाही कोरोनाची लागण झाली आहे. तिची टेस्ट हि पाॅजिटिव्ह आली असून तिची बहिण अमृता आरोराने या माहितीला दुजोरा दिला आहे. दरम्यान मलायकाच्या “इंडियाज बेस्ट डान्सर्सस” या शोच्या सेटवर ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत आले होते.
अर्जून कपूर याची तब्येत जरी बरी असली तरी कोरोनाचे ग्रहण हे संपूर्ण बाॅलिवूड चित्रपटसृष्टीला लागले असून मागे काही दिवसापूर्वी जेष्ठ आभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी