विधानसभा निवडणुकांची चुरस रंगली..

मुंबई, 20 जून 2022: आज विधानसभा निवडणुकीचा फड रंगला. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातली ही लढत नक्की कशी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी आजारी असतानाही मतदान केलं. राज्यसभेच्या पराभवाचा वचपा काढणार असं विधान राष्ट्रवादीच्या खडसे यांनी केल. प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात खरी चुरस रंगणार आहे. अपक्ष कोणाला मत देणार, जादा मतांची अपेक्षा कोणाची पूर्ण होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज पाच वाजल्यानंतर मिळणार आहे.

हिंतेंद्र ठाकूर यांनी अजित पवारांची भेट घेतली. यातून नक्की काय साध्य होणार, कोण जिंकणार, कोण हरणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज पाच वाजल्यानंतर मिळतील, हे नक्की.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा