दुसऱ्यांच्या खांद्यावरून सरकारवर तोफा डागण्याचा प्रयत्न: संजय राऊत

मुंबई, २२ मार्च २०२१: आज संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी सकाळी दहाच्या सुमारास संवाद साधला. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हा केवळ राजकीय विषय असल्याचे सांगत सरकारसमोर इतरही मोठे प्रश्न उभे आहेत, त्यांच्यावर सरकार काम करत आहे असे सांगितले. यावेळी ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तसेच आघाडी सरकारचे प्रमुख मार्गदर्शक शरद पवार यांच्याशी काल बैठकीदरम्यान या विषयाबाबत चर्चा झाली.

पत्रकारांनी परमवीर सिंग यांच्या बाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, “विरोधी पक्ष या गोष्टीवरून राजकारण करत आहेत. याआधी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात परमवीर सिंग यांनी केलेल्या कारवाईवर भाजप प्रश्न उपस्थित करत होता. याचबरोबर नटी कंगना वर कारवाई होत असताना विरोधी पक्षांनी परमवीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे विधान केले होते. मात्र, आता तोच विरोधीपक्ष परमवीर सिंग यांच्या बाजूने बोलताना दिसत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या या भूमिकेवर कितपत विश्वास ठेवावा.”

दुसऱ्यांच्या खांद्यावरून सरकारवर तोफा डागण्याचा प्रयत्न

यावेळी संजय राऊत म्हणाले की, “सध्या राज्यासमोर कोरोनाचे संकट उभे आहे. त्यामुळे प्रामुख्याने सरकारचे लक्ष या गोष्टीकडे आहे. परंतु विरोधी पक्ष इतर गोष्टींवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. परमवीर सिंग यांच्या खांद्यावरून सरकारवर तोफा डागण्यासाठी चे काम विरोधी पक्ष करत आहे. मात्र त्यांच्या तोफांमधून गोळे न निघता केवळ पाण्याच्या पिचकार्‍या निघत आहेत.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा