औंध येथील मद्य विक्री दुकानासमोर लागली रांग

पुणे, दि. ४ मे २०२०: देशात आज तिसऱ्या लॉकडाऊनची सुरुवात करताना केंद्र सरकारने दारुची दुकाने आणि पानाची दुकानं सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. पुण्यामध्ये सुद्धा प्रतिबंधित भाग सोडता इतर भागांमध्ये काही शर्तींसह दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, औंध येथील एका मद्यविक्री दुकानाच्या बाहेर दुकान सुरू होण्याआधीच तळीरामांची मोठी रांग लागलेली दिसली. औंध येथील आयटीआय रोडवर आनंद पार्क भागामध्ये हे मद्य विक्रीचे दुकान आहे. सरकारने मद्य विक्रीसाठी परवानगी दिली असली तरी ते जीवन आवश्यक गोष्टींमध्ये येत नाही त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीचे भान राखून सोशल डिस्टन्स पाळत या गोष्टींची खरेदी करावी. दुकान मालकाने देखील दुकानासमोर सोशल डिस्टन्ससिंग चे फलक लावले आहे. अद्याप प्रशासनाकडून विभागानुसार स्पष्ट निर्देश आलेले नाहीत.

काय आहेत निर्देश:

ऑरेंज व ग्रीन झोन व्यक्तिरिक्त कंटेन्टमेंट झोन वगळता इतर रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील (एका लेनमधील) जीवनावश्यक वस्तू नसलेली स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने (स्टँड अलोन) सुरू करण्यास परवानगी.

या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश असणार आहे. मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त जीवनावश्यक नसलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत. सोशल डिस्टंन्सिंग, गर्दी न करणे यासारख्या नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा