पुणे, दि.२९ मे २०२०: पुणेकरांची अनेक दिवसंपासूनची मागणी असलेल्या औंध- रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उड्डाण पुलापैकी औंध- रावेत या उडडाणपुलाचे आज(शुक्रवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. या पुलामुळे साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: