अखेर अयोध्या खटला बंद; १८पुनर्विचार याचिका फेटाळल्या

28

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या १८ पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे अखेर अयोध्या खटला बंद झाला आहे.
अयोध्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे सांगतानाच सर्वोच्च न्यायलयाने सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद उभारण्यासाठी ५ एकर जागा दिली होती.
कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे पक्षकारांकडून ९ आणि इतरांकडून ९ अशा १८ पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
या सर्व याचिकांचा गुणवत्तेच्या आधारे विचार करून त्या फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला आहे.