बळीराजाचा सण बेंदूर

भारतीय संस्कृती अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर महाराष्ट्र आणि देशातील विविध राज्यात साजरा केला जातो, या विषयी माहिती पाहाणार आहोत.


वाडा शिवार सारं। वडिलांची पुण्याई ।।
किती वर्णू तुझे गुण । मन मोहरून जाई।।
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी राने।।
एका दिवसाच्या पुजेन तुझा होऊ कसा उतराई ।।


भारत हा कृषिप्रधान देश आहे. कृषी संस्कृती हा आपल्या देशाचा श्वास व प्राण आहे. आपला महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. कृषी संस्कृती म्हटलं की शेती, शेतकरी, बैल, शेतीची अवजारे आणि शेतीशी संबंधित अनेक गोष्टी त्यामध्ये येतात.

आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकीच एक आपल्या मातीतील सण म्हणजे बेंदूर. महाराष्ट्र आणि देशभरातील विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो मात्र प्रत्येक प्रदेशानुसार हा सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तसेच प्रत्येक राज्यात हा सण साजरा करण्याचा दिवस ही वेगळा आहे.


महाराष्ट्रात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो. शेतकरी बांधव बेंदूर सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. हा बेंदूर सण कधी आहे? तो कसा साजरा करतात? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.या दिवशी सकाळपासून, बैलांना आंघोळ व चारा घातला जातो. त्यानंतर शिंगाणा रंग रांगोटी, अंगावर झूर घातले जाते. याशिवाय घरात मातीचे दोन बैल प्रतीक म्हणून तयार केले जातात. हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेल्या कडबोळी शिंगावर ठेवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीच्या नैवेद्य दाखवला जातो व नंतर त्यांना पुरण पोळी खाण्यासाठी दिली जाते.


बैलांची खांदे मळणी


बैलांच्या वशिंडापासूनचा पुढील भाग आणि मानेच्या वरचा भाग म्हणजे खांदा सणाच्या दिवशी बैलांची खांदे मळणी केली जाते. खांदे मळणी ही सुद्धा विशेष असते यावेळी बैलांचे खांदे गरम पाण्याने धुतले जातात. म्हणजेच बैलांचे खांदे गरम पाण्याने शकले जातात. त्यानंतर बैलांच्या खांद्यांना हळद लावली जाते. बेंदूर सणाच्या दिवशी बैलांना कोणत्याही कामाला जुंपले जात नाही. दिवसभर त्यांना विश्रांती दिली जाते. या दिवशी शेतकरी बांधव आपल्या सर्जा राजाची मनोभावी सेवा करत असतात.

बैलांची मिरवणूक


बैल आणि अन्य जनावरांना छान हिरवा चारा दिला जातो. दुपारनंतर बैलाला सजवले जाते. त्यांच्या शिंगांना छान रंग दिला जातो. अंगावर झूल घालतात, बेगड्या चिटकवल्या जातात. डोक्याला बाशिंग, गळ्यात घुंगरांची माळ घातली जाते. या दिवशी नवीन वेसन, म्होरकी, कंडा बैलांना घातला जातो. बेंदूराच्या दिवशी बैलांच्या अंगावर विविध प्रकारचे ठसे उमटवले जातात त्यानंतर बैलांची पूजा करून त्यांची मिरवणूक निघते. ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा