भारताने १० आठवड्यांचा लॉकडाऊन करावा:रिचर्ड हॉर्टन

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात प्रत्येक यंत्रणा सक्षमपणे काम करताना दिसत आहे. भारताने आतापर्यंत तब्बल दोन टप्प्यात ४० दिवसांचा लॉकडाऊन केला आहे. तसेच दुसरा लॉकडाऊन ३ मे ला संपणार आहे. यानंतर कदाचित काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल केला जाईल. याबाबत वैद्यकीय लँसेंट जर्नलचे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी भारताने लॉकडाउन हटवण्याची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे.

भारतातील लॉकडाऊन बाबत त्यांनी म्हटलं आहे की, भारताने लॉकडाऊन एकूण १० आठवड्यांचा करावा. कुठलीही महामारी ही कायमस्वरूपी नसते. भारताने जर १० आठवड्यांचा लॉकडाऊन यशस्वी केला तर हि महामारी १० आठवड्यांत नक्कीच संपुष्टात येईल. त्यामुळे भारताला कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यास मोठी मदत मिळेल. यामुळे आर्थिक आणि इतर व्यापार धंद्यातील गोष्टी पहिल्यासारख्या होतील असे त्यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा