इंदौर, ३० मार्च २०२३: मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये आज रामनमवी दिवशी मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने २५ हून अधिक लोक पाण्यात पडले. विहिरीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिक विहिरीच्या पायऱ्यांवर पडलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेलेश्वर महादेव मंदिरात घटलेल्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि इंदूरच्या आयुक्तांना बचाव कार्याला गती देण्याची निर्देश दिले आहेत. सीएमओ इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. इंदूर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.
इंदूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी बचावकार्य राबवत आहे. भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. आतापर्यंत १० जणांना विहिरीच्या पायऱ्यांवरून वाचवण्यात यश आले आहे. तर ९ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित लोकांच्या सुटकेसाठी वेगाने प्रयत्न सुरू असल्याचे राजस्थानच्या आपत्ती व्यवस्थापणाने सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर