अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीने मागितला १५ दिवसांचा अवधी

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट २०२३ : अदानी विरुद्ध हिंडेनबर्ग प्रकरणात तपास करण्यासाठी आणि चौकशीचा स्थिती अहवाल सादर करण्यासाठी सेबीने सर्वोच्च न्यायालयात आणखी १५ दिवसांचा वेळ मागितला आहे. अमेरिकेची शाॅर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गने अदानी उद्योग समूहाच्या कामकाजात हेराफेरी असल्याचा सनसनाटी आरोप करुन खळबळ उडवून दिली होती.

या प्रकरणाचे संसदेतही तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. प्रकरणांच्या एकूण चौकशीसाठी न्यायालयाने विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल या आधीच न्यायालयाकडे सोपविलेला आहे. हिंडेनबर्गने अदानी समुहावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सेबीने सर्वोच्च न्यायालयाकडे याआधीही अतिरिक्त वेळ मागितला होता.

त्यानुसार गेल्या मे महिन्यात न्यायालयाने सेबीला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. सेबीने चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची वेळ मागितली होती. तथापि तीन महिन्यांत म्हणजे १४ ऑगस्टपर्यंत तपास पूर्ण करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. दरम्यान आज पुन्हा सेबीने १५ दिवसांचा अवधी मागितला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा